सुरक्षेच्या कारणावरून रणजित कासलेला दुसर्‍या तुरुंगात हलविले   

बीड : संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड असलेल्या कारागृहात बीडचा बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेला ठेवण्यात आले होते; पण वाल्मीक कराडपासून जिवाला धोका असू शकतो त्यामुळे रणजित कासलेला दुसर्‍या तुरुंगात हलवण्यात आले आहे. वाल्मीक कराड असलेल्या जिल्हा कारागृहामधून सुरक्षेच्या कारणावरून रणजित कसलेला छत्रपती संभाजी नगरच्या हरसूल जिल्हा कारागृहात हलविण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आहे. वाल्मीककराड संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. रणजित कासलेला सुरक्षेच्या कारणावरून बीड जिल्हा कारागृहामधून हलवण्यात आले. त्याला छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे.
 
रणजित कासलेविरोधामध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल होता आणि त्याच प्रकरणात तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये तो होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव त्याला हलवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच जिल्हा कारागरामध्ये आहे आणि बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेने आपल्याला वाल्मीक कराडच्या फेक एन्काऊंटरची ऑफर आल्याचे सांगितले होते. त्याचबरोबर काही गंभीर आरोप केले होते.
 

Related Articles